महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : भूम शहरातील श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिरमध्ये रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बालआनंद मेळाव्याचे उदघाटन सतिश देशमुख यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती गुरुदेव हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव यांनी दर्शविली. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक अंजना मुंढे यांनी केले. यावेळी रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. या मेळाव्यामध्ये २८० विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यासाठी लोकहित बहुउद्देशिय सेवाभावी सामाजिक सस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व प्रथम व्दितीय तृतीय क्रमांक काढून रोख स्वरूपाचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने या वर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.आनंद मेळाव्यात विद्यार्थी – विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक अंजना मुंढे, भूपालसिंह गायकवाड, राजेश भोरे, मुळे, भोरे, पोतरे, भोपलकर, बांगर यांनी परिश्रम घेतले. गुरुदेव दत्त हायस्कूलच्या शिक्षकांनी सहकार्य केले.
