महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
पारगाव : मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने सगेसोयरे अध्यादेश लवकरात लवकर लागू करावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी आज सोलापूर धुळे रस्त्यावर पारगाव (मोटे) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी वाशी तहसीलदार स्वप्नील ढवळे, वाशी पोलीस स्टेशनचे पारगाव बिट अंमलदार राजू लाटे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलकांचे निवेदन मंडळ अधिकारी सचिन पवार, पारगाव सज्जाचे तलाठी किशोर उंद्रे देशमुख, तलाठी समीर पुट्ठेवाड, तलाठी संभाजी तोगरे यांनी स्वीकारले.
यावेळी मराठा बांधव व महिला उपस्थित होत्या.