वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीस वारजे माळवाडी पोलिसांनी दणका दिला आहे. व्यंकटेश फोपळे, (वय १९ वर्षे, रा. सनं १३३, साई कॉलनी, साई बिल्डिंग तळमजला, आम्रपाली हॉटेल जवळ वारजे पुणे मुळगाव बीड) याला अटक करण्यात आली आहे.
माई मंगेशकर हॉस्पीटलच्या शेजारी आरोपीने एका महिलेचा पाठलाग करून अश्लील कृत्य केले. तसेच महिलेच्या स्त्री मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलिस अंमलदार विजय मुरुक व अजय कामठे यांनी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांच्या सुचनांप्रमाणे तपास केला.
या आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. त्याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार या करत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग भिमराव टेळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, व त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी व सत्यजित लोंढे यांनी केली आहे.
