4 जणांना अटक : वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : गाडीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी ४ जणांना अटककेली आहे.
इरफान शेख (वय १९ वर्षे, रा. फ्लॅटनं १०९, बिल्डिंगनंई/पावना, म्हाडा वसाहत, वारजे) अजय खरात, (वय १९ वर्षे, रा. फ्लॅटनं ३१६, बिल्डिंगनंई/मुठा, म्हाडा वसाहत, वारजे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच यात सहभागी असणाऱ्या २ विधीसंघर्षित बालकांना देखील ताब्यात घेतले आहे. फिर्यादी हे त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने फातीमानगर, हडपसर येथील त्यांच्या कामावरून घरी परत जात होते.
तेंव्हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील आर. एम. डी. कॉलेज समोरील गार्डन सिटी चौक येथील वळणावर त्यांच्या पुढे चालणारे दुचाकीस्वार रस्त्याच्या मधून मोटार सायकल चालवित होते.
म्हणून फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्याचा इशारा केला व निघून गेले. दुचाकीस्वारांना त्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी यांच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. त्यांची गाडी अडवून चार व्यक्तींनी फिर्यादी यांना हाताने व वीटांनी मारहाण केली.
त्यांच्या कपाळास व बरगडीस फॅक्चर करून करून पळून गेले. या गुन्ह्याचा तपास करत असताना वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने घटना स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तपास पथकातील पोलिस अंमलदार अजय कामठे यांनी कॅमे-यातील फुटेज मधील दुचाकीस्वार हे वारजे येथील म्हाडा वसाहती मध्ये राहणारे असल्याचे ओळखले.
त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोघ ओलेकर करत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग भिमराव टेळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, तपास पथक प्रभारी अधिकारी रामेश्वर पार्वे व त्यांच्या पथकातील अंमलदार पोलिस अमंलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, व सत्यजित लोंढे यांनी केली आहे.















