महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड करण्यात आली आहे. या चार जणांची नावे समोर आली आहेत. हे चारही जण हवाई दलातील टेस्ट पायलट आहेत. त्यांची नावे आहेत, ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला.आहे.
पंतप्रधान मोदींनी या चारही जणांना आज पहिल्यांदाचा जगासमोर जाहीर केले आहे. या चारही जणांचे रशियात प्रशिक्षण झाले असून सध्या बेंगळुरूमध्ये एस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.
भारताची महत्त्वकांक्षी मोहिम म्हणजे गगनयान मोहिम. चांद्रयान 3 आणि आदित्य एल-1नंतर भारत गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.
इस्रो सध्या गगनयान मिशनवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान भारताची पहिली मानव मोहिम असणार आहे.
गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीरांची निवड होणार यावरुन आता पडदा उठला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 2018मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट निवडण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे.















