खडकी पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ३ अट्टल आरोपींना २४ तासात जेरबंद करण्यात खडकी पोलीसांना यश आले आहे. अनिल बुट्टेवार (वय २८ वर्षे रा, बर्गे वस्ती, चिंबळी गांव, चाकण) रोशन सोनावले (वय २६ वर्षे) संदिप इंगळे (वय ३६ वर्षे) या आरोपीना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली 10 लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी, एक लाख रुपये किमतीची अॅटो रिक्षा असा एकुण १२ लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
फिर्यादी यांचे राहते घर बंद असताना घराची कड़ी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन घरफोडी केल्याची फिर्याद खड़की पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली होती.
खडकी पोलीस स्टेशन तपासपथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक आण्णा गुंजाळ व स्टाप यांनी घटनास्थळ परीसरात सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना माहिती मिळाली की हे घरफोडी करणारे आरोपी हे तालुका कराड जि. सातारा येथे चोरी केलेला माल विक्रीकरीता घेऊन गेले आहेत.
आरोपीचा माग काढुन कराड येथे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन चोरीचा मुद्देमाल दत्तात्रय पवार (वय ४३ वर्षे रा. कपील गोलेश्वर पंचायत टाकीजवळ तालुका कराड जि. सातारा) यांच्याकडे दिल्याचे सांगितले.
या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त खड़की विभाग आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन गिरीक्षकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी कांबळे, पोलीस अंमलदार उध्दव कलंदर, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रताप केदारी, अनिकेत भोसले यांनी केलेली आहे.
