हडपसर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या ५ विधीसंघर्षित बालकांना हडपसर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १,२०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे मांजरी येथील किराणा मालाचे दुकान बंद असताना, आरोपींनी दुकानाचे शटर उचकटुन दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉव्हर उचकटुन त्यामधील पैशाची चोरी केली.
तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे, महेश कवळे, पोलीस अंमलदार यांनी विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. या मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यां मुलांनी दोन दुचाकी रामटेकडी येथून चोरी केली असल्याचे व त्यावरुन रात्री मांजरी येथील किराणा दुकानाचे शटरचे लॉक तोडून, घरफोडी केली असल्याचे सांगितले.
वाहन चोरी केल्याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांचे सहायक पोलीस आयुक्त, हडपसर अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पंडीत रेजितवाड यांच्या मागदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, अनिरुध्द सोनवणे, रामदास जाधव यांनी केलेली आहे.















