देसाई महाविद्यालयातर्फे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे, हरीभाई व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे यांनी ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त’ भिंतीपत्रके व प्रयोग सादरीकरण यांचे प्रदर्शन बुधवार, दि. २८ फेब्रुवारी, सकाळी ११ ते ५ या वेळेत पी जी के एम शाळा, कोंढवा, पुणे याठिकाणी आयोजीत केले होते.
आपण दैनंदिन व्यवहारात वापरत असलेल्या जीवनातील लहानातील लहान घटकांमध्ये सामावलेले शास्त्र आणि त्या शास्त्रामागील शास्त्र समजून घेण्याचा अद्भुत उपक्रम पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व उच्च महाविद्यालयांसाठी आयोजित केला आहे.
विविध आजारावर आहार उपचार, सूक्ष्म जीवशास्त्र, परग्रहवासी, कृत्रिम ज्वालामुखी, पावसाचा सुगंध, अंधश्रद्धा व शास्त्र, अदृश्य शाई, अंतराळशास्त्र, कोरोना प्रतिबंध, कृत्रिम बुद्धिमत्ता, ई. सारख्या अनेक विषयावर पोस्टर व प्रयोग तयार करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जनक शहा, सचीव हेमंत मणियार, दिलीप जगड, प्राचार्य राजेंद्र गुरव व इतर विश्वस्त उपस्थित होते.
देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र गुरव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्याना दिलेल्या या संधीमुळे सुमारे ८०० हुन अधिक ७ पेक्षा जास्त शाळा मधील विद्यार्त्याना शास्त्रामागील शास्त्र समजून घेण्याचा अद्भुत अनुभव मिळाला.
रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, व पर्यावरणशास्त्र या विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, डॉ. विक्रम पंडित यांनी या प्रदर्शनाची तयारी केली. उत्तमपणे संवर्धन, संपादन व सुंदर कलात्मक मांडणी करून प्रदर्शित केलेल्या या प्रदर्शनात भारतीय सापांच्या व माशांच्या जातींना, शास्त्रिय खेळ व अदृश्य शाईने लिहिणे याला मुलांनी अत्यंत उत्साहवर्धक व उदंड प्रतिसाद दिला.