विश्रामबाग पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सराईत मोटार सायकल चोरट्यास अटक करुन त्याच्याकडुन चोरीच्या एकुण २५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी विश्रामबाग पोलीसांनी केली.
संतोष घारे (वय ४२ वर्षे रा. मुपो. ओझरडे, ता. मावळ जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व अंमलदार यांना सुचना दिल्या.
या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल तपासले. तेंव्हा रेकॉर्ड वरील सराईत मोटार सायकल चोर संतोष घारे हा मोटार सायकल चोरी करीत असल्याचे उघड झाले.
त्यानंतर दिपाली भुजबळ यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपी संतोष घारे याचा शोध सुरु केला. पथकातील पोलीस अंमलदार मयुर भोसले व आशिष खरात यांनी आरोपीचा आळंदी, पुणे स्टेशन, देहु, चाकण, पिंपरी येथे सीसीटीव्ही फुटेज वरुन माग काढत सतत ७ दिवस कसोशीने शोध घेऊन त्यास अतिशय शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हयातील तसेच यापुर्वी वेळोवेळी विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतुन चोरी केलेल्या एकुण २५ मोटार सायकल काढुन दिलेल्या आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे, पोलीस अंमलदार राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, गणेश काठे, हेमंत पालांडे, महावीर वलटे, अर्जुन थोरात, साताप्पा पाटील, नितीन बाबर, राहुल मोरे, संतोष शेरखाने, अर्जुन कुडाळकर यांनी केलेली आहे.