महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असताना पॅरोलवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
ही कामगिरी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखेने केली आहे. प्रदीप ऊर्फ शप्पु कोकाटे (वय ३४ वर्षे, रा. वाघ मळा, करंदीकर हॉस्पीटल शेजारी, विठ्ठलवाडी, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार हडपसर, वानवडी व कोंढवा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गस्त घालत होते. पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे यांना माहिती मिळाली की, शिवानंद हॉटेल जवळील, साई गादी कारखाना समोर, खराडी येथे अहमदनगर विसापूर जेल मधील पॅरोल रजेवर सुटलेला व पॅरोल रजा संपलेली असताना पुन्हा जेल मध्ये हजर न झालेला एक आरोपी हा कात्रज-कोंढवा नविन काम चालु असलेल्या रोडवरील हॉट मिक्स प्लॅट जवळ, कोंढवा येथे पिस्टल विक्री करण्याकरीता थांबलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन, शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रविण पवार अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, विनायक रामाणे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, सुदेश सपकाळ यांनी केली आहे.