साडेपाच लाख रुपये किमतीचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्यास अटक करुन त्याचे ३ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
विकास घोडके (वय २८ वर्षे, सध्या राहणार. दयासागर सोसायटी, गणेशनगर, वडगांव शेरी पुणे व मुळगाव रा. मिरी रोड, विद्यानगर, शेवगाव ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडून दाखल गुन्हयात १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हे करण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी, चावीचा जुडगा (गुछा) तसेच इतर गुन्हयातील ७७.२६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सर्व मिळुन ५,५४,७६० रुपये किमंतीचा माल हस्तगत करण्यात आला.
गुन्हे शाखा, युनिट २ च्या कार्यक्षेत्रात प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अशी टीम तयार करुन, उघडकीस न आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या गेल्या.
त्याअनुषंगाने युनिट-२ कडील पोलीस अमंलदार गजानन सोनुने व अमोल सरडे यांच्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यास अटक करुन, पोलीस कस्टडी दरम्यान आणखी ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी विकास घोडके हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी करणारा चोर असुन, त्यावर ठाणे, कल्याण, पिंपरी चिंचवड, लातुर तसेच पुणे शहर भागामध्ये ५० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे, सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण, यांनी केलेली आहे.