महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : येथील तीन कंदील चौक सिद्धिविनायक गणेश मंडळ यांचेकडून सालाबादप्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्रीनिमित्त साकाळी २०० किलो साबुदाणा खिचडी वाटप व सायंकाळी २०० लिटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
या वेळी माजी मंत्री ॲड. दिलीप सोपल यांनी सदिच्छा भेट दिली व उपस्थित भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देवून मसाला दूधाचे वाटप करण्यात आले तसेच मंडळाचे व प्रभाकर (वस्ताद) नायकोजी परिवाराचे कौतुक केले.
या कार्यक्रमाची सुरुवात मंडळातील उपस्थितीत सदस्यांचा हस्ते करण्यात आली. तसेच महाशिवरात्रीचे औचित्य साधून दोन वेगवेगळ्या मुकबधिर शाळेतील मुलांना देखील खिचडीचे वाटप मंडळाच्या वतीने करण्यात आले.
सिद्धिविनायक गणेश मंडळ गेली ११ वर्षा पासून हे कार्य यशस्वीरीत्या पारपाडत आहेत. या कार्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश उर्फे बबन नायकोजी, गिरीष नायकोजी, ललित वस्ताद, रोहित नायकोजी व मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
