दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘व्यापार सरिता गौरव पुरस्कार’ प्रदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : व्यक्तीमत्वाचे सौंदर्य हे ज्ञानाचे सौंदर्य असते असे मनोगत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कौटुंबिक व्यवसायामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘व्यापार सरिता गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ए.सी.पी. नंदिनी वाग्यानी उपस्थित होत्या.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, महिलांनी दागिन्यांनी न नटता वेगवेगळे कौशल्य आत्मसात करत कर्तृत्व सिध्द करुन नटले पाहिजे. उत्कृष्ट कर्तुत्ववान उद्योजक महिलांच्या कामाची जाणीव ठेवून दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम केला त्याबद्दल चेंबरचे आभार मानते व या कर्तुत्ववान महिलांचे अभिनंदन करते.
हा कार्यक्रम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेप्रमाणे आहे, असेही त्यांनी नमुद केले. घराबाहेर जाऊन आपले कर्तुत्व सिध्द केल्याने आपल्याला छान वाटते. प्रत्येक महिलेने आर्थिक साक्षर झाले पाहिजे.
आपण कमविलेल्या पैशांचे नियोजन कसे करायचे हेही बायकांनी समजून घ्यावे. यावेळी नंदिनी वाग्यानी यांनी सांगितले की, घरच्यांनी कौतुक करणे ही गोष्ट खूप मोठी आहे. महिला सक्षमीकरणाचा विचार करुन आमच्या पालकांनी आम्हाला घडविले चेंबरचा कार्यक्रम म्हणजे घरचा कार्यक्रम आहे असे वाटते.
कौटुंबिक व्यवसायामध्ये सहभाग असणाऱ्या महिलांचे कौतुक करण्याचे महत्वाचे काम चेंबर करत आहे व चेंबरचे हे काम खूप कौतुकास्पद आहे. चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार म्हणाले, महिलांच्या हाती आर्थिक दोरीचे कार्य आल्यामुळे संपूर्ण कुंटुंबाला आर्थिक सक्षम करीत आहेत.
यावेळी श्रीराम ऑइल इंडस्ट्रीजच्या तरुलता शहा, रिलायबल ट्रेडर्सच्या मीना शहा, रामेश्वर सेल्स डेपोच्या बसंती भट्टड व रेखा भट्टड, महाराष्ट्र टी सप्लायच्या निलम शहा, उत्तमचंद भिकाचंद आणि कंपनीच्या कुंदा शहा, सुप्रिम ट्रेडर्सच्या अनिता शिंगवी, शिंदे आणि कंपनीच्या लता शिंदे, आकाश मार्केटचे दिपा गुगळे न्यू सच्चा सौदा पेढीच्या कविता गोयल, गोयल ट्रेडिंग कंपनीच्या उषा अग्रवाल, सारा ट्रेडर्सच्या शितल अग्रवाल, राजेश एंटरप्रायजेसच्या निता जाजू, शांतिलाल जी शहा-काजूवालाच्या रुपल शहा, शान टॉपीओका प्रोडक्टसच्या मुनीरा चिकलीवाला, गोविंददास दोशीच्या कविता दोशी, रिध्दी सिध्दी एंटरप्रायजेसच्या शिल्पा दुगड, राजेश सेल्सच्या शर्मिला जैन, आर. बी.ज् ड्रायफ्रुटसच्या रश्मी पुंगलिया, मंगला बाठिया, आईजी सेल्सच्या निर्मला पवार, विजयज् होलसेलच्या प्रिया शिंगवी, ए.बी. इम्पेक्सच्या आरती बोरा, परेश ट्रेडर्सच्या रिता शहा, नशनल सेल्स कॉर्पोरेशनच्या प्रियांका राठोड अशा २५ कर्तुत्ववान महिलांचा “व्यापार सरिता गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, चेंबरचे सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, सुहास दोशी, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदिप शहा, मुकेश छाजेड, मुकेश शहा, महिपालसिंह राजपुरोहित, हरिराम चौधरी, आशिष नहार, प्रकाश नहार, संकेत खिवंसरा, मनिष संचेती व चेंबरचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत ईश्वर नहार यांनी परिचय सुहास दोशी व प्रविण चोरबेले यांनी केला. आभार आशिष दुगड व सुत्रसंचालन सचिन रायसोनी यांनी केले.
