महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल
पारगाव : कर्तृत्ववान महिला म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सहशिक्षिका सुनीता चव्हाण यांचा वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्वत्वान महिलांचा सन्मान सन्मान करण्यात आला.
पारगाव तालुका वाशी येथील रहिवासी व जोगानंद विद्यालय पारगाव घुमरा, तालुका पाटोदा येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुनिता चव्हाण यांना शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन वूमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी नाशिकच्या कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त मा मोनिका राऊत, नाळ चित्रपटातील अभिनेत्री देविका दप्तरदार मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2024 विजेत्या ज्योती शिंदे ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशा पाटील, मंत्राज ग्रीन रिसोरचे अध्यक्ष डॉक्टर के शर्मा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे व आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुनीता चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अच्युत आहीरे आदि सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.















