स्थानिक गुन्हे शाखा : सोलापूर ग्रामीणची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : वैराग येथील मोक्का गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश आले आहे.
नंदकुमार शिंदे, (रा. संजयनगर झोपडपट्टी, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यास, व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेश दिले.
त्याप्रमाणे वरिष्ट पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना केल्या.याप्रमाणे कारवाई करत असताना आरोपी नंदकुमार शिंदे याने फिर्यादीस स्वस्तात सोने देतो असे सांगून त्यांची फसवणूक केली. त्याला जबर मारहाण केली.
या गुन्हयातील काही आरोपी देखील गुन्हा झाल्यापासून अद्यापही आपले स्वतःचे अस्तित्व लपवून फरार झाले होते. या गुन्ह्याचा शोध घेत नागनाथ खुणे व त्यांचे पथक वैराग येथे हजर झाले असताना त्यांना माहिती मिळाली की या गुन्हयातील फरार आरोपी हा गुन्हा झाल्यापासून आपले स्वतःचे अस्तित्व लपवून पत्नी मुलासह नवी मुंबई येथील तुर्भे एम.आय.डी.सी. येथे राहत आहे.
त्यानुसार नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने नवी मुंबई येथील तुर्भे एम.आय.डी.सी येथे जाऊन शोध घेऊन खात्री केली असता, त्यांना माहितीप्रमाणे फरार आरोपी नंदकुमार शिंदे हा तुर्भे एम.आय.डी.सी पोलीस ठाणे हद्दीत राहत असल्याची खात्री झाली. त्याप्रमाणे शिताफीने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता वैराग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी उपविभाग जालिंदर नालकुल हे स्वतः करीत आहे.
ही कामगिरी पोलीस अंमलदार शिवाजी घोळवे, ख्वाजा मुजावर, बापू शिदे, हरीदास पांढरे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, रवि माने, अजय वाघमारे, सुरज रामगुडे, अन्वर अत्तार यांनी केली आहे.