महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन पीएमपीएमएल’ बस चालकाने सहकाऱ्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच त्याच्या कानाचा लचका तोडला. हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराईनगर बस डेपोमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला.
याप्रकरणी प्रदीप आण्णासो सुतार (वय-41 रा. काळेवाडी, ता. पुरंधर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच ठिकाणी काम करतात.
मंगळवारी रात्री फर्यादी सुतार हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी आरोपीला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने कोरे याने फिर्यादी यांना शिवागाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच सुतार यांच्या कानाचा चावा घेऊन कानाची पाळी तोडली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
