कोंढवा परिसरातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : ग्रुप सोडल्याच्या शुल्लक कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार कम्युनिटी सोसायटी, कोंढवा येथे घडला आहे. कोंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मुदब्बीर मतिन पटेल (वय-19 रा. साईबाबानगर, कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आफान मुबारक शेख (वय-19 रा. युनिटी पार्क समोर, कोंढवा), हुशी उर्फ अली हमजा (वय-21 रा. साईबाबा नगर, कोंढवा), साद इनामादार (वय-20 रा. आश्रफ नगर, कोंढवा) व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. फिर्यादी कॅम्प येथे जात असताना तू आमचा ग्रुप का सोडला अशी विचारणा करुन आरोपींनी शिवीगाळ केली. लोखंडी रॉड, लाकडी बांबूने पायावर, पाठीवर, डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर करीत आहेत.
