श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय तर्फे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे महान क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव, आणि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन करून शहिद दिनी अभिवादन करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष किशोर उर्फे बाळसाहेब श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या वेळी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल पल्लवी तौर, क्लार्क विराज पतंगे तसेच वाचनालयाचे वाचक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक-वाचनालयाचे मानद सचिव आनंद पुनमिया यांनी केले. आभार संचालक धिरज कुंकूलोळ यांनी मानले.
