खराडी येथील भव्य दालनाची वर्षपूर्ती
महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल
पुणे : वर्षानुवर्षांपासून विश्वासार्हता, गुणवत्ता, प्रामाणिकता आणि सचोटी या तत्त्वांवर दागिन्यांचा व्यवसाय करत रांका ज्वेलर्सची ग्राहकांच्या मनात खास जागा आहे. हाच वारसा आता पुढच्या पिढ्याही कौशल्याने निभावत आहेत.
सातव्या पिढीतील ऋषभ रांका हे नगर रोड, खराडी येथील भव्य दालनाची धुरा सांभाळत आहेत. ऋषभ यांनी शिकागो येथील Purdue University तून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. खराडी येथील ६५०० स्के. फुटाच्या भव्य आणि नावीन्यपूर्ण दालनाची निर्मिती ऋषभ यांच्या संकल्पनेतून झाली आहे.
आपल्या शिक्षणाचा आणि पिढ्यापिढ्यांचा वारसा बरोबर घेत तोच विश्वास आणि नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऋषभ यांनी गेल्या वर्षभरात मोठे यश संपादित केले आहे. असेच यश येत्या काळातही संपदान करण्याचा विश्वास दाखवत, वर्षभरापूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ झालेल्या या दालनाच्या एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने बोलतांना ते म्हणतात; “वर्षभरापूर्वी नगर रोड, खराडी येथे आमचे नवे दालन सुरु झाले. इतर दालनांप्रमाणेच इथेही आम्हांला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
वेगवेगळ्या कलेक्शन्सच्या माध्यमातून विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेच्या बळावर उभा असणारा हा सोनेरी वारसा तुमच्यापर्यंत घेऊन येतांना त्याला नावीन्याचा साज चढवण्याचा प्रयत्नही आम्ही केला. इथले ग्राहक हे भारतातील वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत.
त्यामुळे त्यांच्या पसंतीनुसार सोने, चांदी, हिरे, जडाऊमधील पारंपरिक दागिने व ट्रेण्डी दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स इथे उपलब्ध असतात. हा वर्षभराचा टप्पा आम्हांला बरंच काही शिकवणारा होता आणि त्याच अनुभवावरुन आता येणाऱ्या काळात आम्ही आपल्यासाठी नवनवीन डिझाईन्स आणि व्हरायटी घेऊन येऊ. तसेच इथून पुढेही नवनवीन कलेक्शन्स व आकर्षक ऑफर्ससह आम्ही आपल्या सेवेत कायम असू आणि तुमचा विश्वास सार्थ करु.
