महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : देशात सद्या लोकसभेचे गरम वारे जोरात वाहत आहे.पुणे लोकसभेत यावेळी जैन समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्व देण्यात न आलेला महाराष्ट्रातील जैन समाज मुंबई,पुणे व नाशिक या शहरातील लोकसभे सोबतच पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतो. कारण मागील पाच ते दहा वर्षात जैन समाजाचे संपूर्ण राज्य भरातून नोकरी,व्यवसाय व शिक्षण या गरजे पोटी या तिन्ही शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे.
नुसत्या पुण्यातच बोलले गेले तर एक लाखाच्या आस पास जैन मतदार या लोकसभेच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो.आणि हा समाज राज्य भरातून स्थलांतरीत झालेला असल्यामुळे तो वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराचा समाज आहे.त्यामुळे भाजप सह कोणत्याच पक्षाने हा समाज आपल्याच मागे राहील ही गणिते बांधणे त्यांना कदाचित अडचणीचे ठरू शकेल.
राजकीय दृष्ट्या प्रमुख सर्वच पक्षात जैन समाजातील एक किंवा दोन नेते आहेत.मात्र या निवडणुकीत हा लाख भर समाज आपल्या हातात ठेवायचा असेल तर काही ठोस व्युव्हरचना उमेदवारांना करावी लागणार आहे.