आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जयराज भवनचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Spread the love

पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेत उभारण्यात आलेल्या ‘जयराज भवन’ चा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दोन वर्षांपूर्वी गुढिपाडव्याच्या दिवशी या वास्तुचे उद्घाटन जयराज ग्रुपचे राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त एकपात्री हास्य कलाकार मकरंद टिल्लू यांचा “हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा” हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या हास्यमय कार्यक्रमाबरोबरच टिल्लुंनी त्यांच्या जलरक्षक प्रबोधिनी संस्थेमार्फत गेल्या १२ वर्षात पाणी वाचविण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. त्या माध्यमातून पाणी वाचविण्यासाठी गळणारे नळ बदलण्याकरीता उपस्थितांनी सातशे नवे नळ घेण्यासाठी देणगी जमा केली.


यानिमित्ताने संस्थेच्या सभासदांपैकी आपापल्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तसेच सामाजिक संस्थांमध्ये उच्च पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये ललित अमृतलाल शहा यांच्या श्री ओम कन्स्ट्रक्शन या कंपनीस उत्कृष्ट बांधकाम पध्दतीबद्दल आर्किटेकस् इंजिनियर्स अँड सर्वेअरस् असोसिएशन पुणे या संस्थेचा सन २०२४ चा आयसा (AESA) अवार्ड मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ व सदस्य जयराज ग्रुप ऑफ कंपनीज्चे राजेश शहा यांना पुणे मर्चंटस् चेंबरचा उत्कृष्ट व्यापारी ऊत्तम पुरस्कार, जनसेवा फाऊंडेशन मधील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, एच व्ही देसाई आय हॉस्पिटलच्या अध्यक्षपदी निवड याबद्दल राजेश शहा यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप डाह्याभाई मेहता यांचा जैन वधुवर परिचय संस्था पुणेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच विलास जयंतीलाल शहा यांचा जैन श्वेतांबर मुर्तिपूजक युवक महासंघ पुणेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भरत के. शहा. सेक्रेटरी सुनील र. शहा. प्रतिभा ग्रुप ऑफ ईंस्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. दिपक शहा, पुणा गुजराती बंधु समाजचे विश्वस्त केतन कपाडिया. श्री. गोडी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्ट चे चेअरमन भरत आर. शहा, विश्वस्त राजिव शहा, सुधिर शहा. सदाशिव जैन मंदिराचे अध्यक्ष देवेंद्र शहा. संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य नरेंद्र शहा, सुनील शहा तसेच समाजातील मान्यवर व संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.