समर्थ पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सराईत वाहन चोरास बेड्या ठोकण्यात समर्थ पोलीसांना यश आले आहे. ललीत भोई/परदेशी, (वय-२९ वर्षे, धंदा-नाही रा. विश्वनाथ अर्पाटमेन्ट, पाचवा माळा, ८६ पर्वती गावं) याला ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडे चोरीस गेलेली दुचाकी मोटार सायकल ताब्यात घेतली आहे. शहरसमर्थ पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, सुनिल रणदिवे व तपास पथकातील पोलिस अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
पोलीस अंमलदार इम्रान शेख व शरद घोरपडे यांना माहिती मिळाली की, पदमजी पार्क लेन, राजेवाडी झोपडपट्टीच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयासमोर एक व्यक्ती दुचाकी मोटार सायकलसह संशयितरित्या थांबलेला आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांना कळविली असता, त्यांनी या ठिकाणी जाऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगितली. तपास पथकातील स्टाफसह या ठिकाणी जाऊन खात्री केली असता, हा व्यक्ती पोलीसांना पाहताच दुचाकी मोटार सायकल तेथेच सोडुन पळुन जावु लागला. त्याला लागलीच स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचे विश्रामबाग सहकारनगर पर्वती पोलीस स्टेशन व मानोरा पोलीस स्टेशन जिल्हा वाशीम या पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच या आरोपीवर यापुर्वी देखील परीसरात गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ संदिपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना रुक्मीणी गलांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनानुसार व संतोष पागार, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, शिवा कांबळे, औचरे, रहीम शेख, कल्याण बोराडे, अविनाश दरवडे यांनी केली.
















