आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जिनशासन सेवा प्रतिष्ठानतर्फे २५ हजार ५०० लाडूंचे वाटप

Spread the love

महावीर जन्म कल्याणक निमित विशेष आयोजन

तीर्थकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२३ व्या जन्मकल्याणक दिन आणि २५५० व्या निर्वाण कल्याणक वर्षानिमित मार्केटयार्ड येथील जिनशासन सेवा प्रतिष्ठानने पुण्यातील प्रमुख मंदिरे आणि विविध सेवाभावी संस्थेमध्ये २५ हजार ५०० लाडूंचे वाटप केले.

या मंगलदिनी स्व. रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या प्रेरणेने ‘जिनशासन सेवा प्रतिष्ठान‘ची सामाजिक व धार्मिक सेवेसाठी स्थापना करण्यात आली. यावेळी मार्केटयार्ड मधील सर्व दुकानातील कर्मचारी, कामगार, हमाल यांना लाडूचे वाटप करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील १०-१५ प्रमुख मंदिरात भाविकांना लाडूचे वितरण करण्यात आले.

याशिवाय अंध-अपंग, मुक-बधिर शाळा, वृद्धाश्रम, विविध सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिला, कर्मचारी यांना लाडूचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे संयोजन दिना प्रकाश धारीवाल यांनी केले.

जिनशासन सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र बाठीया, ललित गुंदेचा, रमेश गांधी, नगराज गुंदेचा, रमेश जैन सह अनेक सहयोगी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.‘जिनशासन सेवा प्रतिष्ठान‘ ही संस्था राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.