मोहोळ पोलीसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा रोखण्यात यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : मैत्री करण्याच्या बहण्याने बोलावून घेवून इतर साथीदारांच्या मदतीने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मोहोळ शहरात पेट्रोलींग करीत असताना पोलिसांना पंढरपुर रोड लगत कोर्टाच्या बाजुला चार इसम थांबले असल्याचे दिसले. त्यातील एक इसम पोलीसांना पाहुन हातवारे करीत होता. पोलीसांना संशय आल्याने ते घटनास्थळी पोहोचले असता त्यातील ३ जण पोलीसांना पाहून पळू लागले. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.
त्यांना मोहोळ पोलीस ठाणे येथे नेल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. फिर्यादी संतोष कल्याण माने हे त्यांच्या दुकानात काम करीत असताना मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून एका महिलेचा फोन आला. तिने ओळख काढण्याचा प्रयत्न करून भेटण्यासाठी गळ घातली. महिलेने त्यांना मोहोळला भेटायला बोलावले.
तिने त्याला कोर्टाच्या बाजुला या असे सांगीतले. फिर्यादी तिथे गेला असता तीन अनोळखी व्यक्तींनी त्याला घेरले व फिर्यादीस दमदाटी करु लागले. तीन लाख रुपये दे नाहीतर पोलीस ठाण्यात या महिलेला तुझ्या विरुद्ध तक्रार करायला लावतो असे धमकावले. जबरदस्तीने खिशातील मोबाईल व तीन हजार रुपये हे जबरदस्तीने काडून घेतले.
त्याचवेळी पेट्रोलींग करत असणारे मोहोळ पोलीस ठाण्याचे सिध्दनाथ मोरे, अमोल जगताप, अजित मिसाळ यांनी त्या पैकी दोघांना जागेवर पकडले. एक इसम तेथुन पळून गेला. विनायक गोपीनाथ नवगीरे (वय ३८ वर्षे रा सिध्देश्वर हॉस्पीटल जवळ मुरारजी पेट सोलापूर) २) गौतम राम गटकांबळे (वय ३१ रा. हसीपुर ता अक्कलकोट जि सोलापूर) अशा दोघांना पकडण्यात आले.
पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव राहुल कांबळे (रा. अक्कलकोट) असे असल्याचे समजले. यातील दोन आरोपींना अटक करुन मोहोळ न्यायालय येथे हजर केले आहे. ३,०००/रु रोख रक्कम आरोपींकडून जप्त करण्यात आलेली आहे.
पोलीसांच्या सतर्कतेमुळे सदरचा प्रकार टळला व फिर्यादींची आरोपीच्या ताब्यातुन सुखरूप सुटका झाली. या प्रकरणी विनायक गोपीनाथ नवगीरे (वय ३८ वर्षे रा सिध्देश्वर हॉस्पीटल जवळ मुरारजी पेट सोलापूर २) गौतम राम गटकांबळे (वय ३१ रा हसीपुर ता अक्कलकोट जि सोलापूर ३) राहुल कांबळे ४) सीमा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, अक्कलकोट विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत मोहोळ पोलीस ठाणे, सपोनि शंकरराव वलेकर, आकाश भिंगारदेवे, सचिन माने, सिध्दनाथ मोरे, अमोल जगताप, अजित मिसाळ, यांनी गुन्हयातील आरोपी पकडुन कैशल्यपुर्ण तपास करून गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यास व तपासकामी मदत केली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
महीला अनोळखी नंबर वरुन फोन करून मैत्री करण्याचे बहाणा करुन बोलावुन घेवून इतर साथीदारांच्या मदतीन लुटण्याचा व त्यांचे जाळ्यात अडकवण्याचा प्रकार करु शकतात तरी नागरीकांनी सतर्कता बाळगावी, असा प्रकार कोणासोबत घडला असल्यास मोहोळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन मोहोळ पोलिसांनी मोहोळ शहर व ग्रामीण भागातील नागरीकांना केले आहे.
