मतदान करण्याचे सर्वांना आवाहन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे शहर लोकसभेसाठी निवडणूक उद्या 13 मे रोजी होणार आहे.या निवडणुकीत सर्वांनी सहभाग घ्यावा व आपली लोकशाही बळकट करावी असे आवाहन 103 वर्षाचे मतदार चंद्रभानजी भन्साळी यांनी केले आहे.
यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने वयाचे 85 पूर्ण करणाऱ्या मतदार राजाचे घर बसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध केल्यामुळे मतदान करणारे आजी-आजोबा यांच्या चेहऱ्यावर एक आनंद व काहींच्या डोळ्यात अश्रू दिसून आले.
असाच एक प्रसंग म्हणजे गुलटेकडी येथील गंगाधम परिसरात राहणारे चंद्रभान भन्साळी यांनी वयाच्या 103 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला.हे मतदान करताना त्यांनी कोणालाही जवळ येऊ न देता गुप्त पद्धतीने मतदान केले.
माझे वय १०३ असताना मी मतदानाचे कर्तव्य केले आहे , आपन सर्वानी मतदान करावे असे आवाहन त्यानी यावेळी केले.अठराव्या लोकसभेसेसाठी आम्हास मतदान करता आल्यामुळे निवडणूक आयोगाचे व आलेल्या सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
या वयात मतदान करण्यासाठी असलेली आतुरता व मतदान केल्याचा आनंद पाहून आम्ही अवाक झालो असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी यावेळी मत व्यक्त केले.
