छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छावा प्रतिष्ठान बार्शीतर्फे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : छावा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती मैदान या ठिकाणी आयोजित केलेल्या रनिंग स्पर्धेमध्ये शेकडो युवक-युवती उत्साहात सहभागी झाले. या स्पर्धा यशस्वीरीतीने पार पडल्या.
या अंतर्गत 1600 मीटर मुलांसाठी व 800 मीटर मुलींसाठी रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जवळपास 40 ते 50 युवती व 150 ते 200 युवक सहभागी झाले होते, या कार्यक्रमासाठी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल शेख तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार बापु शितोळे, क्रीडाअधिकारी आप्पासाहेब बरबडे, नितीन बरबडे, डी एस स्टॉक मार्केटचे संचालक डी. एस. भाले, पी. एम. एल. जिमचे प्रदीप लोंढे, विकास पाटील तसेच बार्शीतील सर्व अकॅडमी व अभ्यासिकेचे शिक्षक व संचालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी बार्शी तालुक्यासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.
या रनिंग स्पर्धेमध्ये मुलींमधून स्नेहा मल्लिनाथ निंबर्गी, सोलापूर (प्रथम क्रमांक), भारत महागडे, बार्शी (द्वितीय क्रमांक), भाग्यश्री संतोष खताळ, साकत (तृतीय क्रमांक), तनुजा धनाजी लंगोटे, बोरगांव (उत्तेजनार्थ), कु. करुणा महादेव गुंजाळ, नागोबाचीवाडी (उत्तेजनार्थ) यांनी बक्षीस मिळवले तर मुलांमधुन, राहुल अप्पासाहेब चव्हाण, सांगली (प्रथम क्रमांक), हर्षद रामराव अलंदर, सांगली (द्वितीय क्रमांक), विजय तानाजी गुलदगड, बारामती (तृतीय क्रमांक), विराज विजयकुमार जाधवर, धाराशिव (उत्तेजनार्थ), किरण सर्जेराव अनपट, बार्शी (उत्तेजनार्थ) यांनी बक्षीस मिळवले.
या स्पर्धेसाठी विशाल कौलगे, नाना जाधव, आशरफ खुदावंद, पंकज रणदिवे यांनी कोच म्हणून काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बार्शीतील सर्व अकॅडमीचे संचालक व विद्यार्थी तसेच छावा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.















