जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेवून मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पुर्ण करावीत. तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस,पूर,वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, रो.ह.यो.उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने, आपत्ती वय्वस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त् संदिप कारंजे, महावितरणचे कार्य.
अभियंता संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रातांधिकारी, तहसिलदार तसेच संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.