कोंढवा पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मॉर्निंग वॉक करीत असलेल्या व्यक्तीचा आयफोन हिसकावुन पळून जाणाऱ्या आरोपीला सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातुन पकडून जेरबंद करण्यात आले. ही कामगिरी कोंढवा पोलीसांनी केली आहे.
या प्रकरणी हादीहासन सर्फराज इराणी ( वय २३ वर्षे, रा.न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी, हांडेवाडी रोड, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील दोराबजी मॉलजवळ फिर्यादी हे सकाळी मॉर्निंग वॉक करीत मोबाईलवरुन गाणी ऐकत होते.
त्यावेळी त्यांच्या हातातील आयफोन मोबाईल एका अनोळखी मोपेड दुचाकीवरील व्यक्तीने हिसकावुन चोरी केला. याबाबत कोंढवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
या सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाच्या आजुबाजुला असणाऱ्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हेगाराला शोधले.
आरोपी हा सायंकाळच्या सुमारास हांडेवाडी चौकात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्टाफच्या मदतीने हांडेवाडी चौकात सापळा रचून त्याला पोलिसांनी पकडले. अंगझडतीत चोरी केलेला आयफोन मोबाईल फोन मिळाला. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप. निरीक्षक बालाजी डिगोळे हे करित आहे.
ही कामगिरी पोलीस उप. आयुक्त परि. ५ आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग गणेश इंगळे, यांच्या मार्गदशनाखाली पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, विकास मरगळे, शशांक खाडे, अक्षय शेंडगे, अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, सुहास मोरे, राहुल थोरात यांनी केली आहे.
