महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडील वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीला आळा घालण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस अशी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.
या आदेशांप्रमाणे परिमंडळ-५ कार्यक्षेत्रांतील सहायक पोलीस आयुक्त व वानवडी विभागांच्या अधिपत्याखाली येणारे वेगवेगळया पोलीस स्टेशनकडील सराईत गुन्हेगारांचे अभ्यास करून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
स्वप्नील काळभोर, (वय-२३ वर्षे, रा. रायवाडी, लोणीकाळभोर, हवेली), शरद मोरे, (वय-३० वर्षे, रा. कोरेगाव मुळ, हवेली), दादा ऊर्फ आकाश कांबळे, (वय-२८ वर्षे, रा. थेऊर, हवेली) गोपाळ ऊर्फ गोप्या इंगवले, (वय-२५ वर्षे, रा. तळेगाव मारुती मंदिराजवळ, ता. देवणी, लातुर,) श्रीजय कांबळे, (वय-२६ वर्षे, रा. थेऊर, हवेली), रोहित गायकवाड, (वय-२३ वर्षे, रा. स.नं.१०६, गोसावी वस्ती, वैदवाडी, हडपसर) रोहन गायकवाड, (वय- २१ वर्षे) शुभम खिलारे, (वय-२३ वर्षे, रा. स.नं. ३१५, मार्केडेयनगर, वैदवाडी, हडपसर), आनंद कामठे, (वय-२८ वर्षे, रा. ओटा नं. २५ कोठारी ब्लॉक रोड, बिबवेवाडी) संजय भिसे, (वय-४९ वर्षे, रा. स.नं ६४९/१२/१ खडकेवस्ती, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) विनोद ऊर्फ बैजु बिनावत, (यय-४८ वर्षे, रा. स.नं.६७, सातवनगर, गणपती मंदिराजवळ, हांडेवाडी रोड, हडपसर), शिवम ऊर्फ शिवा माने, (वय-२९ वर्षे, रा. ६४८/२, आण्णभाऊ साठेनगर, बिबवेवाडी,) माधव ऊर्फ महादेव घुमरे,( वय-३९ वर्षे, रा. स.नं.१०९, अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर) यांना तडीपार करण्यात आले आहे.
महिना ते 2 वर्ष या कालावधीसाठी या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे त्यांचे तडीपार कालावधीमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाण्यास किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबतचे आवाहन करण्यात येत आहे.
