महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : एसएससी परीक्षा सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांनी खुप मोठे यश संपादन केले आहे.
या मध्ये इयत्ता दहावीचा निकाल पुढील प्रमाणे : परीक्षेला बसले ४९६, विशेष श्रेणीसह उत्तीर्ण २४५, प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण १६३, द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण ६०, पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण १७,एकूण उत्तीर्ण ४८५, विद्यालयाचा शेकडा निकाल- ९७.९८% लागला.
विद्यालयात आलेले ३ क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक चव्हाण सिद्धी हनुमंत (९९.२०%),द्वितीय क्रमांक नलवडे नम्रता कल्याण (९८.६०%) व तृतीय क्रमांक बोधले अमृता अनंत(९८.२०%) सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही.एस.पाटील, बी. के. भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
