महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुणे पोलिसांनी कल्याणीनगर येथील अपघातानंतर रात्री उशिरा फिरणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई सुरु केली आहे.
ड्रंक ड्राईव्हचे कारवाई सोबत इतर ६८५ कारवाया करुन ६,२४,६५० रुपये दंड आकारण्यात आला. पुणे शहरात मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रविण पवार सह पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन संयुक्तपणे संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये २२ पोलीस स्टेशन अंतर्गत २४ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.
कारवाई करीता प्रत्येक पोलीस स्टेशन कडील १ पोलीस अधिकारी व ४ अंमलदार व वाहतूक शाखेकडील १ पोलीस अधिकारी व ३ अंमलदार याप्रमाणे एका नाकाबंदीचे ठिकाणी २ पोलीस अधिकारी व ७ अंमलदार नेमण्यात आले होते.
ड्रंक ड्राईव्ह कारवाई करीता ब्रेथ अॅनालायझर चा वापर करण्यात आला. या कारवाई दरम्यान एकुण २५७३ वाहनांची कसुन तपासणी करुन १५४ वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये सर्वात जास्त १४ कारवाया, मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत १० कारवाया, खडक पोलीस स्टेशन व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे हद्दीत प्रत्येकी ९ अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.
तसेच ड्रंक ड्राईव्हचे कारवाई सोबत इतर ६८५ कारवाया करुन ६,२४,६५० रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी १,४९,८०० रुपये दंड नाकाबंदी दरम्यानच वसुल करण्यात आलेला आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारे अचानक नाकाबंदीचे आयोजन करुन कारवाया पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडुन करण्यात येणार आहेत.
