महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पत्नीचा साडीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीस येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पत्नी रुक्सार खाजा उर्फ रीहान मुलाणी हीचा साडीने गळा आवळून पती खाजा उर्फ रिहान मुलाणी याने खून केल्याची तक्रार रुकसार हिची आईने दिली होती
रूकसार हीचा हा दुसरा विवाह होता. त्यांचे पटत नव्हते.
त्यामुळे आरोपी रीहाण तिचा छळ, करून चारित्र्यच्या संशयावरून भांडण, मारहाण करीत होता. खुनाची घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडली.
त्यावेळी घरात ते दोघेच होते.
पोलिसांनी कौशल्याने तपास केला. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदार नसताना घराचे मालक व शेजारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षा तर्फे तपास अधिकारी डी. डी. उदार यांनी काम पाहिले.
त्यांनी परिस्थितीजन्य पुरावा जोरदारपणे मांडला. सत्र न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्षाची जन्मठेप व एक लाखाचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

















