महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसरच्या परिसरात घातक शस्त्रे बाळगून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम टेकडी इंडस्ट्रियल एरियात काही लोक अवैध शस्त्रे बाळगून जमल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली.पोलिसांनी तातडीने हालचाल करीत ६ जणांना ताब्यात घेतले.
आदित्य महेंद्र शिंदे (वय २२ वर्षे, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर,) साहील खंडू पेठे, (वय २१ वर्षे, रा. तरवडे वस्ती, महंदवाडी रोड, हडपसर) नोवेल जॉन वाल्हेकर (वय १९ वर्षे,) सुहान मुजावर खान (वय १९ वर्षे) दरोडा टाकण्याचे तयारीत असताना मिळुन आले.
त्यांना अटक करण्यत आली आहे. त्यांच्या जवळून लोखंडी हत्यार, रस्सी,स्क्रू ड्रायव्हर आदी घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट तपास करीत आहेत.















