महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे वाघोली तील एका महिलेला अज्ञात मोबाईल धारकाने शेअर्स ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करुन त्यामधुन चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवुन ४५,०७,५००रुपयांची आर्थक फसवणुक केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी वाघोली येथिल केसनंद रोड वरील एका ३८ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात ताकार दाखल केली आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार १२ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान घडला आहे.
वेळोवेळी त्यांनी रकमा भरल्या मात्र नफा किवा परतावा मिळाला नाही. त्यमुळे अखेर वाट पाहून त्यांनी अनोळखी मोबाईल धारका विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यांची ४५,०७,५०० रुपयांची फसवणुक झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगांवकर तपास करीत आहेत.
