त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध: उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.बी.वाय.यादव,उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे,सचिव पदी पी.टी.पाटील, सहसचिव पदी ए.पी.देबडवार व खजिनदार पदी जे.सी.शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी १७ – अर्ज दाखल झाल्याने सर्व संचालकांची निवड बिनविरोध पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भागवत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची निवडणुकीची प्रक्रिया मागील आठवड्यापासून सुरू होती.
अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सतरा जागांसाठी सतरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मागील नऊ वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया बिनविरोधपणे पार पडली आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड केल्याची माहिती निवडणूक अधिकारी भागवत चव्हाण यांनी दिली. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.बी.वाय.यादव,उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे,सचिव पदी पी.टी.पाटील, सहसचिव पदी ए.पी.देबडवार व खजिनदार पदी जे.सी.शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्याबद्दल त्यांचे पदाधिकारी सदस्य यांच्या कडून अभिनंदन होत आहे. मागील तीन निवडणुकां झाल्या होत्या. यंदा मात्र सर्व सहमतीने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे.
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वी १५ जणांचे संचालक मंडळ होते मात्र यावर्षी त्यात दोन नियुक्त संचालकाची वाढ करून संचालक मंडळाची संख्या ही १७ झाली आहे. बिनविरोध संचालक : डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. बी वाय यादव, तानाजी शिनगारे, डॉ. विलास देशमुख, राजेंद्र पवार, विष्णू पाटील, दिलीप रेवडकर, नंदकुमार जगदाळे, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, अरुण देबडवार सोपान मोरे, दिलीप मोहिते, जयकुमार शितोळे शशिकांत पवार हे १५ संचालक निवडून आले आहेत. यासोबतच नव्याने दोन नियुक्त संचालक केले आहेत. त्यामध्ये यामध्ये डॉ. प्रकाश बुरगुटे व डॉ. कृष्णा मस्तुद यांचा समावेश आहे
