महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटला जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पायी जाणाऱ्या युवकाचा मोबाईल हिसकावल्याचा प्रकार गंगाधाम परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी २१ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. फिर्यादी युवक २६ जून रोजी मध्यरात्री गंगाधाम चौकातून जात असतांना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.
पोलिसांनी तातडीने हालचाली करून आसीफ नसीर खान (वय२२ रा. एव्हरग्रीन बेकरीजवळ, मिठानगर, कोंढवा) व फैजान इम्तीयाज अहमद शेख (वय १८ रा. नवाजीश पार्क, लेन नं ५, मिठानगर, कोंढवा) या दोघाना अटक केली आहे.
त्यांच्याकडून आणखी काही मोबाईल लुटण्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करीत आहेत.
