महाराष्ट्र जैन वार्ता
पारगाव : प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या शिष्या प. पू. कुसुमलताजी म. सा व प. पू. अरुण प्रभाजी म. सा. यांचे कोटेचा फार्म हाऊस येथून विहार करून पारगाव येथे आगमन झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष बाबूशेठ डुंगरवाल, हर्षल बोरा, प्रदीप नाहटा, मंगेश सुराणा, सुदर्शन नाहटा, अनिल डुंगरवाल, सुभाष नाहटा, गोटू नाहटा, सुभाष मुथा, ओमप्रकाश उपाध्याय, अनिल नाहटा, डॉ. रायचंद बोरा, विठ्ठल सुराणा यांनी स्वागत केले. यावेळी चौसाला येथील संघाचे सुभाष बेदमुथा, बाळूकाका नहार, मयूर नहार, भूषण खिवंसरा यांच्या सह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पू. कुसुमलताजी म. सा. यांचा चातुर्मास प्रवेश १२ जुलैला पारगाव येथून स्वागत जुलूस काढून चौसाळा येथे होणार आहे.

















