महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्व. बाबुलालजी बागमार यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त बागमार परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन स्वारगेट येथील दादावाडी येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 225 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरामध्ये आधार ब्लड बँक, सह्याद्री हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल येथील ब्लड बँक उपस्थित होत्या. यावेळी डॉ. राजन संचेती, राम बांगड, डॉ जयंत नारंगे, विशाल धनवडे, शांतिलाल ब्राह्मणीया, बागमार परीवारासह, समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
