• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 28, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

दुष्काळात पुरंदरच्या मुक्या जनावरांना मिळाला आधार

August 2, 2024
0
WhatsApp Image 2024 08 02 at 5.28.59 PM
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

‘बीजेएस’ची यमाईशिवरी, वाल्हेची चारा छावणी ठरली वरदान

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने यमाई शिवरी येथे दि. २८ एप्रिल, तर वाल्हे (ता. पुरंदर) येथे दि. १५ मे पासून प्रत्येकी ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभी केली. १००० जनावरांच्या दोन चारा छावणीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय पशुपालकांच्या चेहऱ्यावरची चिंता देखील मिटली शेतकरी-पशुपालकांना मोठा आधार आणि दिलासा मिळाला.

मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे, उन्हाळ्यात पुरंदर तालुक्यात माणसांपेक्षा जनावरांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत होते. ना प्यायला पाणी, ना चारा. चारा-पाण्याशिवाय मुक्या जनावरांची होरपळ होत होती. महाग झालेला चारा घेणे शेतकर्‍यांना परवडत नव्हते. अशा परिस्थितीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ‘चारा छावणी’ उभारण्यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले. त्या आवाहनाला भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला.

शिवरी चारा छावणीसाठी शिवरी ग्रामपंचायतीने, तर वाल्हेला ग्रामस्थ शिरीष शहा यांनी १० एकर जागा मोफत उपलब्ध करून दिली. पण छावणी उभी राहिल्यावर खरी गरज होती ती निधीची. मग जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्या पुढाकाराने एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनी सीएसआर फंड उपलब्ध करून दिला. यासाठी बीजेएसच्या सपना सिंग, टी. जयराजन, फारूक कुरेशी यांनीही पाठपुरावा केला.

छावणी सुरू झाल्यावर सुरुवातीलाच पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ संतोष पाटील, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी शिवरी छावणीची पाहणी करून आढावा घेतला, तसेच या उपक्रमाचे कौतुक केले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्हे छावणीला भेट देऊन समाधान व्यक्त केले. या दोन्ही चारा छावणीत प्रत्येक जनावरांसाठी रजिस्टरप्रमाणे दररोज १८ किलो हिरवा-ओला किंवा ८ किलो सुका, १ किलो पशुखाद्य तसेच मुबलक पाण्याची सोय करण्यात आली होती. यामुळे जनावरे तर गुबगुबीत झालीच, शिवाय पौष्टिक खाद्यामुळे दुधात चांगली वाढ झाल्याचे पशुपालकांनी आवर्जून सांगितले.

“एका दुभत्या जनावराचा महिन्याला पाच-सहा हजार चार्‍याचा खर्च होता. आमचा ७ जनावरांमागे महिन्याला ३५ हजारांचा खर्च तर वाचलाच, शिवाय एका जनावराच्या दुधात दीड-दोन लीटरने वाढ झाली. हा सर्वच शेतकर्‍यांना मोठा आधार झाला,” असे वाल्हेचा युवा पशुपालक प्रतीक मदने याने सांगितले. रुक्मिणी गोपाळ कदम या आजिबाईंनी आपली एक गाय वाल्हे छावणीत आणली होती. त्यांनी सांगितले, “हिरवा चारा दिल्याने दुधात निम्याने फरक पडला. एक-दीड लीटर दूध देणारी गाय, आता दोन-तीन लिटरवरवर आलीय.”

इथे आलेल्या जनावरांचे मालक-शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन आणि बीजेएसचे आभार मानले. एक शेतकरी म्हणाले, “बाहेरून चारा विकत घ्यायला पाच जनावरांमागे आतापर्यंत महिन्याचे २०-२५ हजार रुपये गेले असते, पण छावणीत आल्याने आम्हाला मोठा हातभार लागला.” जूनमध्ये दुष्काळी भागांचा दौरा करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आवर्जून वाल्हे छावणीस भेट देऊन शेतकरी-पशुपालकांशी चर्चा केली. तेव्हा शेतकर्‍यांनी, चांगला पाऊस होईपर्यंत छावणी सुरू ठेवण्याची मागणी केली.

त्यानुसार पवारांनी जिल्हा प्रशासन-बीजेएस व्यवस्थापनास छावणी सुरू ठेवण्याची सूचना केली. प्रशासनाने वाल्हेची छावणी दि. २४ जुलैपर्यंत सुरू ठेवली, यामुळे पशुपालक-शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. या चारा छावणींचे वैशिष्ट्य म्हणजे चारा-पाण्याबरोबरच जनावरांची नियमीत घेतली जाणारी काळजी. जनावरे कोणत्याही आजारांना-रोगांना बळी पडू नये, म्हणून पुरंदरच्या पशुवैद्यकीय अधिकारी अस्मिता कुलकर्णी यांच्या टीममधील वाल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. माणिक बांगर हे प्रत्येक जनावरांची नियमित तपासणी करीत.

आवश्यक असलेल्या जनावरांना औषध-पाणी देत. या दोन्ही छावण्यांचे बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनात बीजेएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश नवलाखा यांनी चोख नियोजन ठेवले, तर अशोक पवार यांनी व्यवस्थापनाचे काम पाहिले. चांगला पाऊस झाल्यावर दि. १९ जूनला शिवरीची आणि दि. २४ जुलैला वाल्हेची छावणी बंद करण्यात आली. तेव्हा येताना पोट खोल गेलेली, मरतुकडी होत चाललेली जनावरं, जाताना मात्र गुबगुबीत आणि टुणटुणीत होऊन गेली. जिल्हा प्रशासनानं घेतलेला निर्णय जनावरांसाठी मोठा आधार ठरला होता.

मुक्या जनावरांसाठी जिल्हा प्रशासन तत्परतेने धावून आले आणि त्यांना दुष्काळात मोठा दिलासा मिळाला. एवढेच नाही तर, ही मुकी निष्पाप जनावरे कत्तलखान्यात जाण्यापासून किंवा विक्रीपासून वाचली. आज ती जनावरे आपल्या गोठ्यात हंबरताना दिसत आहेत. याचं कारण जिल्हा प्रशासनाची तत्परता, सामाजिक संस्था बीजेएसचा पुढाकार, सीएसआर फडांची योग्य साथ आणि अनेक हातांची निस्वार्थी मदत यामुळे कोणत्याही कठीण आपत्तीवर सहजतेने मात करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

02 08 24 22

Latest Articles

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

June 28, 2025

Maharashtra News Netwrok

June 28, 2025
हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025
राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

June 28, 2025
विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
Load More
Previous Post

महारेराने सदनिकाधारकाची नुकसान भरपाईची तक्रार फेटाळली

Next Post

सीटीईटी परिक्षेत ३ लाख ६६ हजार उमेदवार ठरले पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025
राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

June 28, 2025
विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

June 28, 2025

Maharashtra News Netwrok

June 28, 2025
हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025
राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

June 28, 2025
विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

June 28, 2025

Maharashtra News Netwrok

June 28, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta