विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणूकीच्या बहाण्याने ११ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार विश्रांतवाडी परिसरात घडला आहे.
याप्रकरणी धानोरीतील एका महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाने त्यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधला होता. त्याने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी त्यांना सांगितले.
त्यातून मोठा नफा मिळेल असे सांगून त्यांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. व त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी रक्कम गुंतवणूक केल्या. एकूण त्यांनी ११ लाख १० हजार रूपये जमा केले.त्यातून नफा न मिळाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली आहे. हा तपास पोलिस निरीशक सांळुके करीत आहे.
