मनोज जरांगे पाटील यांचे कात्रजमध्ये जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कात्रज : आता मागे हटायचे नाही, मराठ्यांची एकी काय असते,ते कात्रजकरांनीदाखवून दिले आहे. आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही, तुम्हीही हटू नका. मी समाजासाठी माझा जीव पणाला लावलाय. राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आता मुंबईला धडक मारावीच लागेल,असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कात्रज येथे रविवारी दुपारी दिला.
कात्रज येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.पुण्यात सारस बागेतील सभेसाठी जात असताना दुपारी दीड च्या सुमारास त्यांच्या वाहनाचा ताफा कात्रज मध्ये थांबला. यावेळी उपस्थित हजारो मराठा बांधवानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
संपूर्ण परिसर भगव्या ध्वजांनी सजला होता. पोलिसांनी दोन्ही बाजूने वाहतूक थांबवली होती. संपूर्ण परिसर बांधवानी गजबजून गेला होता. सात जेसीबीतून जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. तब्बल १५ फुटाचा हार क्रेन द्वारे त्यांना घालण्यात आला.
एक मराठा,लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, मराठा आरक्षण मिळवणारच अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आता मी गप बसत नसतो. गरीब मराठे माझ्या बाजूने आहेत. आरक्षण दिले नाही तर राजकारण्यांचा छाताडावर पाय ठेवणार. गरीब पोरासाठी मी लढतोय… मला माझा समाज महत्वाचा आहे.
आता मागे हटणार नाही. मराठ्यांची ताकत काय असते.तुम्हा राजकारण्यांना दाखवावीच लागेल. असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर सकलमराठा समाजाचे नेते, युवा कार्यकर्ते संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारस बागेत सभेस जाण्यासठी त्यांनी पाच तास लागले. रस्त्यावर ठीक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता.