आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हडपसर व वानवडीतील ८ गुन्हेगार तडीपार

Spread the love

पुणे : पुणे शहरपरिमंडळ ५ हडपसर व वानवडी कार्यक्षेत्रांतील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांच्या  आदेशानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारावर ठोस  कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले होते. नमूद आदेशांप्रमाणे परिमंडळ ५ कार्यक्षेत्रांतील सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग व वानवडी विभागाच्या अधिपत्याखाली येणारे वेगवेगळया पोलीस स्टेशनकडील सराईत गुन्हेगाराच्या अभिलेखाचा अभ्यास करुन दि. १२ ऑगस्ट रोजी ८ सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) कलम ५६ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १, मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ४, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १ असे एकूण ८ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) कलम ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हयांतून यांना तडीपार करण्यात आलेले आहे.

तडीपार गुन्हेगार हे त्यांच्या कालावधी मध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र.११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस स्टेशन किंवा कार्यालयात संपर्क साधुन माहिती कळवावी असे अवाहन पोलिसांनी केले आहे.