कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : कोथरूडच्या मयुर कॉलनी रोडवर सेन्ट्रल बँकेच्या गेट समोर चालत जाणाऱ्या एका ७० वर्षय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. त्याची किमत सुमारे ३ लाख रुपये आहे.
या महिलेने आरडा ओरडा केला पण चोरटे पळून गेले. मंगळवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास ही घटना घडली. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप करीत आहेत.














