महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गावठी हातभट्टी दारुविक्री करणारा सराईत गुन्हेगार शामकांत विष्णु सातव, (वय ३९, रा. आव्हाळवाडी रोड डोमखेल वस्ती वाघोली ता. हवेली) यास पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातुन दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणारा शामकांत विष्णु सातव हा गुन्हेगार आहे.
सहायक. पोलीस आयुक्त येरवडा प्रांजली सोनवणे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय झुरुंगे, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन उपायुक्त विजयकुमार मगर यांना प्रस्ताव पाठविला असता मगर यांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन दीड वर्षाकरीता सराईत गुन्हेगारावर पोलीस तडीपारची कारवाई केली आहे.