महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आदर्शनगर सोसायटी, मार्केट यार्ड, येथे 15 ऑगस्ट च्या शुभदिनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोसायटीचे सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते.
या निमित्ताने महेश नामपूरकर, मिलिंद भोंडे, नरेंद्र चौबळ, आणि अभय संचेती यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका राजश्री ताई शिळीमकर यांच्या उपस्थितीत झाला.
याच बरोबर सोसायटीचे चेअरमन श्रीकांत जगताप, सेक्रेटरी श्रीकांत कुलकर्णी, राजन पवार, कमलापुरकर आणि सोसायटीतील सर्व सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असताना सोसायटीमध्ये वृक्षारोपण करून आदर्श सोसायटीने खऱ्या अर्थाने आदर्शवत कार्य केले असून समाजासाठी आणि इतर सोसाट्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मनोगत शिळीमकर यांनी व्यक्त केले.
आदर्श सोसायटीतील सर्व सदस्यांनी यावेळी वृक्षारोपण करून यापुढे हे वृक्ष जतन करण्याचा निर्धार केला. कोरोनामध्ये ऑक्सिजनची किंमत काय असते हे सर्वांना लक्षात आले त्यामुळे खऱ्या अर्थाने नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांनी आदर्श सोसायटी प्रमाणेच पुढाकार घेण्याची गरज आहे. असे मत आदर्श सोसायटीचे चेअरमन श्रीकांत जगताप यांनी व्यक्त केले. मिलिंद भोंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.