सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : युट्युब सबस्क्रिशन नावाने टास्क पुर्ण करण्यास सांगुन जास्त कमिशन मिळण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी तरुणाने फिर्यादीशी संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास जास्त नफा देण्याचे आमिष दाखवले.
टास्क पुर्ण करण्याकरिता देण्यात आलेले रक्कम अनोळखी नंबर वर पैसे पाठवण्यास भाग पाडुन फिर्यादी यांची एकुण ८,०९,५००/- रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे). क्षीरसागर तपास करीत आहेत.