कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऐनवेळी विमानाचे तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न महागात पडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मोबाईलवर वेबसाईटवर विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी माहिती शोधत होते. त्या साइटवर एक मोबाईल नंबर दिला होता.
त्या मोबाईल नंबर वर कॉल करुन माहिती विचारली असता सदर व्यक्तीने रद्द तिकीटाची रक्कम परत करण्यासाठी फिर्यादी यांचे बॅक व डेबिट कार्डचे तपशील विचारुन अॅप डाउनलोड करण्यास सांगितले व फिर्यादी यांचे नेट बँकिंग खात्यात दोन लाभार्थी जोडून फिर्यादी यांच्या बँक खात्यातुन वेळोवेळी रक्कम काढुन एकुण ८,८६,०००/- रुपये किमतीची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम हे करीत आहेत.