बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडीतील रम्यनगरी सोसायटी मधील दुकान लाईनमध्ये सिक्युरीटी गार्डचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीना २४ तासात अटक करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ०४ ऑगस्ट रोजी पहाटे ०५.०० वाजता रम्यनगरी सोसायटीमधील कोठारे ज्वेलर्स समोर अंगावर शाल घेवुन पडलेले असताना दोन अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादीस लाथा मारल्या तसेच हातातील कोयत्याने फिर्यादीचे दोन्ही हातावर व डोक्यामध्ये जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सपासप वार करून गंभीर जखमी केले.
त्यामुळे फिर्यादीचा उजवा हात फॅक्चर झाला असून, डोक्यामध्ये वीस टाके पडले आहेत. फिर्यादीस मारहाण करणाऱ्या दोन अनोळखी इसमापैकी एक अंगाने जाड असलेल्या इसमाने अंगामध्ये हुडी घातलेली होती व दुसऱ्या अंगाने सडपातळ असलेल्या इसमाने तोंडाला रूमाल बांधलेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयातील आरोपींचा पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, मंगल मोढवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत होते.
आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज चेक करून अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, संजय गायकवाड, संतोष जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून तपास पथकातील आधिकारी व अमंलदार यांनी आरोपी प्रतिक सुभाष बिबवे (वय २६ वर्ष रा. गणात्रा कॉम्प्लेक्स डी विंग, फ्लॅट १०, बिबवेवाडी कोंढवा रोड मार्केटयार्ड) २) क्षितीज विनायक जैनाक (वय २२ वर्षे रा.४०२, नवीपेठ गांजवे चौक जवळ, आप्पा पडवळ पथ पुणे) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे तपास करता त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी यास जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने वार केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना गुन्हयात अटक करून त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.