• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात बेळगावहून दोघे सायबर चोरटे जेरबंद

February 21, 2026
0
21 2 26 2
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

व्हॉट्सअॅपवर कंपनीच्या मालकाच्या नावाने मेसेज करून केली फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : व्हॉट्सअॅपवर कंपनीचा मालक मेसेज करत असल्याचे (डीपीवर मालकाचा फोटो ठेवून) भासवून क्लायंटचे पेमेंट करायचे असल्याचे सांगत ‘मॅन इन मिडल’ सायबर फ्रॉडद्वारे कंपनीची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथून दोघांना अटक केली आहे.

अजय रामविलास यादव (वय २२, रा. लक्ष्मीनगर, काकटी, बेळगाव) आणि सलमान गोस मोहियोद्दीन अजनाल (वय ३२, रा. झटपट कॉलनी, बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत कोथरुड येथील कंपनीतील अकाउंट मॅनेजरने सायबर पोलीस ठाण्यात ३० जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दिली होती.

त्यांना कंपनीच्या मालकाचा फोटो डीपीवर असलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून २८ जानेवारी रोजी मेसेज आला होता. त्या मेसेजवरून ‘किनया’ या नावाच्या बँक खात्यावर ९५ लाख रुपये पाठविण्यास सांगण्यात आले होते. तसेच कंपनीच्या कोणत्या खात्यातून पैसे पाठवायचे, याची माहितीही देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी पैसे पाठवले.

त्यानंतर दुसऱ्या एका खात्यावर १ कोटी रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी १ कोटी रुपये पाठवले. त्यानंतर ३० जानेवारी रोजी पुन्हा त्याच क्रमांकावरून मेसेज आला. त्यात १ कोटी ९० लाख रुपये पाठविण्यास सांगण्यात आले.

त्यावेळी दुपारी बारा नंतर पेमेंटला उशीर होणार असल्याने त्यांनी हडपसर येथील मालकाच्या कार्यालयात लँडलाईनवर संपर्क साधला. त्यावेळी मालकांनी असे कोणतेही पेमेंट करण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.

यानंतर त्यांनी पुन्हा व्हॉट्सअॅप चॅट उघडून पाहिले असता, डीपी व नाव मालकाचे असले तरी मोबाईल क्रमांक मात्र त्यांच्या मालकाचा नसून अनोळखी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्ह्यात वापरण्यात आलेले अॅक्सिस बँकेचे खाते ‘कन्नया इंटरप्रायझेस’ या नावाने बेळगाव येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी बँक खातेधारकाच्या मुलगा अजय यादव याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून सलमान अजनाल याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३ मोबाईल फोन, अॅक्सिस बँकेचे पासबुक आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक पोलीस आयुक्त शुभदा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे तसेच पोलीस अंमलदार संदेश कर्णे, प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शीतल डांगे आणि अनिकेत भिंगारे यांनी केली.

प्रत्यक्ष संवादाने फसवणूक टाळता येईल
शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष, अटकेची भीती, पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती, वीज किंवा गॅस कनेक्शन बंद होण्याची धमकी, ऑनलाइन बँक केवायसी अपडेट करण्याचे संदेश अशी प्रलोभने किंवा धमक्या मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे. कंपन्यांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये नियमित वापरात असलेल्या ई-मेलमध्ये किरकोळ बदल करून किंवा व्हॉट्सअॅपवर मालकांचा फोटो डीपी म्हणून वापरून मालकच बोलत असल्याचा भास निर्माण करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कंपनी मालकांनी त्यांच्या अकाउंट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवावा. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.

Feb 20265 1

Latest Articles

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

February 21, 2026
श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

February 21, 2026
लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

February 21, 2026
दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

February 21, 2026

दुनिया में दो चेहरे वाले लोग भी होते हैं।

February 21, 2026
Load More
Previous Post

लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Next Post

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

February 21, 2026
श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

February 21, 2026
दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात बेळगावहून दोघे सायबर चोरटे जेरबंद

दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात बेळगावहून दोघे सायबर चोरटे जेरबंद

February 21, 2026
लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

February 21, 2026
दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

February 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

February 21, 2026
श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

February 21, 2026
दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात बेळगावहून दोघे सायबर चोरटे जेरबंद

दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात बेळगावहून दोघे सायबर चोरटे जेरबंद

February 21, 2026
लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

February 21, 2026
दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

February 21, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

February 21, 2026
श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या अध्यक्षपदी जयंत शहा

February 21, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta