मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड परिसरातील आदर्शनगरच्या बंगल्यातून चंदनाचे झाड चोरीस गेल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशिलदत्त बंगला, आदर्श नगर, प्लॉट नं.३० येथे राहणाऱ्या फिर्यादीच्या घराच्या कंपाउन्डमध्ये असलेले १५,०००/- रुपये किमतीचे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी कापुन चोरुन नेले.
गेल्या काही महिन्यात शहरातील बंगल्यांच्या आवारातील जुनी चंदनाची झाडे चोरीस जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. जुन्या झाडांना बाजारात मोठी किमत मिळते. त्यामुळे चोरटे रात्री सुनसान जागा हेरून अशी झाडे कापून नेत आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आहे. हा तपास पोलीस उप निरीक्षक राहूल जोग करीत आहेत.